इंग्लंड टीमचा ब्रॉड दुखापतग्रस्त

March 8, 2011 5:30 PM0 commentsViews: 4

08 मार्च

इंग्लंड टीमसमोरच्या दुखापतीच्या समस्या वाढत चालल्यात पीटरसन पाठोपाठ आता स्टुअर्ट ब्रॉडही दुखापतग्रस्त झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याचा उजवा हात आणि कंबर लचकली. आणि बांगलादेशविरुद्धची मॅच आता तो खेळू शकणार नाही. काल त्याच्या दुखर्‍या हाताचं स्कॅनिंग करण्यात आले. पण त्याचा अहवाल आल्यावरच दुखापतीचं स्वरुप कळू शकेल. पहिल्या दोन लीग मॅचही ब्रॉड खेळू शकला नव्हता. पण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये मात्र तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 16 रनमध्ये 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. हार्नियाचा त्रास होत असल्यामुळे केविन पीटरसन या आधीच मायदेशी परतला. तर आता स्टुअर्ट ब्रॉडचं दुखणं तितकं गंभीर असू नये अशीच प्रार्थना इंग्लिश टीम करत आहे.

close