द्रमुक आणि काँग्रेसमधील वाद अखेर मिटला

March 8, 2011 5:39 PM0 commentsViews: 1

08 मार्च

केंद्र सरकारमधून बाहेर पडू असा नाट्यमय पवित्रा घेतल्यानंतर आज अखेरीस द्रमुकने काँग्रेसच्या सर्व मागण्या मान्य केल्या. काँग्रेसने 63 जागा मागितल्या होत्या. आता ठरल्यानुसार काँग्रेसला 63 जागा मिळणार आहेत. त्यातल्या 62 जागा द्रमुक देईल तर 2 जागा छोटे मित्रपक्ष देतील. द्रमुकच्या नेत्यांसोबत प्रणव मुखजीर्ंनी दोन बैठका घेतल्यानंतर हा तोडगा निघू शकला. विधानसभा निवडणुका महिन्याभरावर आल्यामुळे आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास सीबीआयच्या हातात असल्यामुळे द्रमुकने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून समजतंय. आता द्रमुकसोबतचा तंटा संपला असला तरी उद्यापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या जागावाटपासंबंधी चर्चा सुरू होणार आहेत.

close