न्यूझीलंडने उडवला पाकिस्तानचा 110 रन्सने धुव्वा

March 8, 2011 6:03 PM0 commentsViews: 2

08 मार्च

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन तगड्या टीममध्ये आज मुकाबला रंगला. आणि यात न्यूझीलंडनं बाजी मारली. न्यूझीलंडने पाकिस्तानचा तब्बल 110 रन्सनं धुव्वा उडवला. पहिली बॅटिंग करणार्‍या न्यूझीलंडने विजयासाठी 302 रन्सचं आव्हान ठेवलं होतं.आणि याला उत्तर देणार्‍या पाकिस्तानची दाणादाण उडाली. 125 रन्समध्ये पाकिस्तानचे 8 बॅट्समन आऊट झाले. पण अब्दुल रझ्झाकने एकाकी झुंज देत पाकिस्तानला 150 रन्सचा टप्पा पार करुन दिला. रझ्झाक 62 रन्सवर आऊट झाला. तर पाकिस्तानची टीम 192 रन्सवर ऑलआऊट झाली. या पराभवामुळे पाक टीम पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर घसरली. तर न्यूझीलंडच्या टीमनं अव्वल स्थानी झेप घेतली.

close