धुळ्यात मुख्यध्यापकानी केलं विद्यार्थ्यांचं लैगिंक शोषण

March 9, 2011 9:55 AM0 commentsViews: 18

09 मार्च

लैंगिक शोषणाचा असाच आणखी एक प्रकार धुळ्यातही घडला. आश्रमशाळेतल्या मुलांचं मुख्याध्यापकांनीच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला. मोराणे इथल्या भागाबाई वाघ शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतला हा प्रकार आहे. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र कांबळे यांनी शिर्डीतल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर शाळेतही ते प्रकार त्यांनी सुरूच ठेवले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्फत हा प्रकार उघडकीला आणला. धुळे पोलीस स्टेशनमध्ये मुख्याध्यापक कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुध्याध्यापक मात्र फरार आहेत.

close