अपंगांच्या शाळांना अनुदानित दर्जासाठी आमरण उपोषण सुरू

March 9, 2011 10:10 AM0 commentsViews: 1

09 मार्च

राज्यातील अपंगांच्या विशेष शाळांना अनुदानित शाळांचा दर्जा मिळावा यासाठी एक मार्चपासून मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु आहे. अपंगांसाठी विशेष शाळा चालवणारे संस्थाचालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. राज्यातील अशा शेकडो शाळांना अनुदान देण्याचे आदेश 2008 मध्ये राज्यसरकारने दिले होते. पण समाजकल्याण खात्याने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. दुसरीकडे, 2010 मध्ये समाजकल्याण आयुक्तांकडे पुन्हा एकदा सर्व शाळांनी अनुदानासाठीचा प्रस्तावही सादर केला. पण समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. संस्थाचालकांना शाळा चालवणं कठीण झाल्यामुळे त्याचा त्रास अपंग विद्यार्थ्यांना होतोय.

close