कोतवाल हत्या प्रकरणी ; कोतवाल कुटुंबीयांचे धरणे आंदोलन

March 9, 2011 10:27 AM0 commentsViews: 1

09 मार्च

अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाल सय्यद सलीम आणि अनिल सोनवणे या दोघांचीही वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली. त्यानंतर या कोतवालांच्या कुटुंबीयांना सरकारने वार्‍यावर सोडलं. आरोंपीविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. पण कोतवालांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळाली नाही याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानात आजपासून धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय. नाशिकचे ऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबीयांना जशी सरकारने मदत केली तशी आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला तातडीने सरकारने नोकरी द्यावी अशी मागणी कोतवालांच्या संघटनेने केली.

close