भारताने नेदरलँडला 189 रन्समध्ये गुंडाळले

March 9, 2011 12:44 PM0 commentsViews: 3

09 मार्च

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि नेदरलँड दरम्यान मॅच मध्ये पहिली बॅटिंग करणार्‍या नेदरलँडने विजयासाठी भारतासमोर 190 रन्सचे टार्गेट ठेवलं आहे. टॉसचा कौल आज नेदरलँडच्या बाजूनं लागला आणि नेदरलँडनं पहिली बॅटिंग घेतली. एरीक आणि बेरेसीनं पहिल्या विकेटसाठी 56 रन्सची पार्टनरशिप करत चांगली सुरुवात केली. पण पियुष चावलाने एरिकची विकेट घेत ही जोडी फोडली. तर युवराजने बेरेसीला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. यानंतर ठराविक अंतराने हॉलंडच्या विकेट्स जात राहिल्या. नेदरलँडचा कॅप्टन बोरेन आणि मुदस्सर बुखारीनं शेवटच्या ओव्हरमध्ये थोडीफार फटकेबाजी करत स्कोर वाढवला. बोरेननं सर्वाधिक 38 रन्स केले. भारतातर्फे झहीर खाननं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानाचं पिच बॅट्समनना साथ देईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण भारतीय स्पिनर्सनी बॅट्समनना तशी संधीच दिली नाही असं म्हणावे लागेल. युसुफ, हरभजन, चावला आणि युवराजनेही रन रोखण्याबरोबरच विकेट घेण्याचंही काम पार पाडलं. पियुष चावलाला त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मार पडला. पण एकतर त्याने भारतीय टीमला ब्रेक थ्रू मिळवून दिला. आणि महत्त्वाच्या 2 विकेटही घेतल्या. दहा ओव्हरमध्ये 47 रन देत त्याने 2 विकेट घेतल्या. पियुषच्या बरोबरीने प्रभावी ठरला तो युवराज सिंग. टेन ड्यूसकाटेचे महत्त्वाची विकेटही त्यानेच घेतली. 9 ओव्हरमध्ये 43 रन देत त्याने दोन विकेट घेतल्या. युसुफ आणि हरभजननेही रन रोखण्याचे काम चोख पार पाडलं. मात्र फास्ट बॉलर्सना शेवटच्या पॉवर प्लेमध्ये जोरदार मार पडला. अखेर झहीरने हॉलंडची इनिंग गुंडाळली. एकूण 6 ओव्हर्समध्ये 20 रन देत 3 विकेट घेतल्या. तर आशिष नेहराने पाच ओव्हरमध्ये 22 रन देत एक विकेट घेतली. हरभजन सिंगने रन्स रोखण्याचे काम चोख बजावलं असलं तरी त्याला एकही विकेट घेण्यात मात्र यश आलं नाही.

close