सचिनच्या वर्ल्ड कपमध्ये 2000 धावा !

March 9, 2011 1:58 PM0 commentsViews: 2

09 मार्च

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपमध्ये आणखी एका रेकॉर्डची नोंद आपल्या नावावर केली. वर्ल्डकप स्पर्धेत 2000 रन्सचा टप्पा पार करणारा तो जगातला पहिला बॅट्समन ठरला आहे. नेदरलँडविरुध्दच्या मॅचमध्ये खणखणीत फोर मारत त्यानं हा रेकॉर्ड केला. वर्ल्डकपमधील 40 मॅचमध्ये त्याच्या नावावर 5 सेंच्युरी आणि 13 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 152 रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. यात टेस्ट क्रिकेटमध्ये 51 तर वन डे क्रिकेटमध्ये 47 सेंच्युरीचा समावेश आहे.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि नेदरलँडदरम्यान मॅच रंगतेय. पण टीम इंडियाच्या इनिंगची अडखळती सुरुवात झाली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनं आपल्या घणाघाती हल्ल्याच्या जोरावर टीमला दणक्यात सुरुवात करुन दिली. पण पीटर सेलारनं सेहवागला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सेहवाग 39 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर सचिननं वर्ल्ड कपमध्ये 2000 रन्स तर पूर्ण केले पण त्यानंतर सेलारनं सचिनलाही 27 रन्सवर आऊट केलं. तर आज तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या युसुफ पठाणलासुद्धा सेलारनं पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याअगोदर पहिली बॅटिंग करणार्‍या नेदरलँडनं विजयासाठी भारतासमोर 190 रन्सचे टार्गेट ठेवलं आहे.

close