शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर गुन्हा दाखल

March 9, 2011 2:57 PM0 commentsViews:

09 मार्च

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू निहार ठाकरे याच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहविक्रय प्रतिबंधक अर्थात पिटा कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल निहार हा बिंदा ठाकरे यांचा मुलगा. निहार हा संगिता बारचा मालक आहे. पोलिसांनी एकुण 9 जणांना अटक केली यात 6 बारगर्ल्सनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना माझगाव कोर्टात हजर कऱण्यात आले. निहार आणि तिघे या प्रकरणी फरार आहेत.

close