ऊर्जाप्रकल्प कोकणातच कशाला ? – राज ठाकरे

March 9, 2011 5:08 PM0 commentsViews: 3

09 मार्च

जैतापूर प्रकल्पाला आमचा विरोध नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीआड महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच येणार नाही. पण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन योग्यप्रकारे झालं पाहिजे या शब्दात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज सहाव्या वर्षात पदार्पण केलंय. त्यानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जोरदार फटकेबाजी केली. मुंबईत वाढणार्‍या झोपडपट्‌ट्यांना सत्ताधारी शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. तर मनसेला सोबत घेण्यावरुन युतीत जुंपली असली तरी आपण मात्र स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

close