अंधेरीत इमारतीला भीषण आग

March 10, 2011 9:18 AM0 commentsViews: 2

10 मार्चमुंबईत अंधेरी चार बंगला इथल्या कांचनगंगा बिल्डिंगला आग लागली आहे. कांचन गंगा बिल्डिंगला 12 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. हा मजला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. बिल्डिंगमध्ये अडकलेल्या सहा रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. तसेच ही आग विझवण्यासाठी 16 फायर इंजिन्स घटनास्थळी रवाना झाली आहेत.

close