हसन अलीला पुन्हा एका दिवसाची कोठडी

March 10, 2011 9:30 AM0 commentsViews: 2

10 मार्च

हजारो कोटी रुपये कर चुकवल्या प्रकरणात हसन अलीला पुन्हा एक दिवसाची ईडी(एन्फोर्समेंट डिरेक्टरेट) कोठडी देण्यात आली आहे. ईडीनं सेशन्स कोर्टाकडे हसन अलीला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. यासंदर्भात हाय कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. हसन अली प्रकरणासंदर्भात अद्यापही कोर्टात पुरावे का सादर केले नाही असं म्हणत काल न्यायमुर्ती एम.एल तहलियांनी यांनी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटला फटकारलं होतं.

दरम्यान काशिनाथ टापुरीयाची ईडीकडून चौकशी तीन तास झाली. टापुरीया हा हसन अलीचा पार्टनर असल्याचा आरोप आहे. हसन अलीने टापुरीयाच्या मार्फत 14 कंपन्यांमध्ये 7 लाख डॉलर्स गुंतवल्याचा आरोप ठेवण्यात आला. दरम्यान हसन अलीशी आपला संबंध नसल्याचा दावा काशिनाथ टापुरीयानी केला.

close