पृथ्वीराज चौहानांनी मार्गारेट अल्वांचे आरोप फेटाळले

November 7, 2008 10:18 AM0 commentsViews: 4

7 नोव्हेंबरनिवडणूक तिकीटवाटप प्रक्रियेवर टीका करून , काँग्रेसच्या सरचिटणीस मार्गारेट अल्वा यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. घराणेशाहीचा आरोप नको म्हणून, पक्षानं कर्नाटक निवडणुकांमध्ये आपल्या मुलांना तिकीट नाकारलं होतं. आता मात्र पाच राज्यात होणा-या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं, कित्येक पदाधिका-यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली गेल्याचं , अल्वा यांनी म्हटलं आहे. कर्नाटक निवडणुकात तिकीट अक्षरशः विकली गेल्याचं मार्गारेट अल्वांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र अल्वा यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. पक्षाच्या भल्यासाठीच त्यावेळचे निर्णय तिकीट वाटप समितीने घेतले होते, असं चव्हाण यांनी आरोपाचं खंडन करताना स्पष्ट केलं.

close