जैतापूर प्रकल्पाबाबत राणेंच्या निवस्थानी बैठक संपन्न

March 10, 2011 8:15 AM0 commentsViews: 1

10 मार्च

कोकणात आज गुरूवारपासून शिमगोत्सवाच्या सणाला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर जैतापूर प्रकल्पासंदर्भात नारायण राणेंनी कणकवलीतल्या आपल्या निवासस्थानी रत्नागिरीतल्या महत्वाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत कायदा सुव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. या बैठकीला कोकण परीक्षेत्राचे आयजी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि रत्नागिरीचे एस.पी. उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यानंतर प्रकल्पग्रस्तांवर सुरु झालेल्या कारवाई आणि प्रकल्पग्रस्तांचा वाढलेला असंतोष याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय.

close