देशपातळीवर एकच सीईटी घेणार

March 10, 2011 4:42 PM0 commentsViews: 1

10 मार्च

यापुढे देशपातळीवर एकच मेडीकल सीईटी घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. पण या निर्णयाची अंमलबजावणी 2011 साली होणार का पुढील शैक्षणिक वर्षापासून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी मात्र महाराष्ट्रात पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी होईल यंदा राज्याची मेडीकल सीईटी होईल असं स्पष्ट केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण राज्यात बहुतांश विद्‌यार्थी राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देतात.

close