कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी !

March 10, 2011 4:49 PM0 commentsViews: 3

10 मार्च

मनमाड आणि लासलगावच्या कांदा मार्केटमध्ये कांदा कवडीमोल किंमतीनं विकला जात आहे. एक रुपया किलो दराने सध्या कांद्याची विक्री सुरु आहे. या निचांकी दरामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे तर कंबरडंच मोडलंय आहे. त्यामुळे निर्यात शुल्क अजून कमी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे. काल सव्वा रुपये किलो दराने कांदा विकला जात होता.

close