कोतवाल परिषदेचं मुंबईत आंदोलन

March 10, 2011 7:33 AM0 commentsViews: 1

10 मार्च

आझाद मैदानात सध्या कोतवाल परिषदेचं आंदोलन सुरु आहे. राज्यातल्या 12 हजार कोतवालांना सेवेत सामावून घ्यावे अशी कोतवालांची प्रमुख मागणी आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कामगारांचा दर्जा द्यावा, पेन्शन आणि इतर सुविधाही मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या मान्या केल्याचे आश्वासन दिलं आहे. पण जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

close