घाटकोपरमध्ये दरोड्याचा प्रयत्न ; पोलिसांवर गोळीबार

March 10, 2011 5:59 PM0 commentsViews: 2

10 मार्च

मुंबईत घाटकोपरमध्ये पहाटेच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला. पहाटे 4 वाजताच्या सुमारास पंतनगरमधल्या बी. बी ज्वेलर्स लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न होता. दरोड्याची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांनी पोलिसांवरही गोळीबार केला. यात एक पोलीस जवान जखमी झाला. जखमी पोलिसाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दरोडेखोर पसार झाले आहेत.

close