श्रीलंकेचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

March 10, 2011 6:09 PM0 commentsViews: 4

10 मार्च

अखेर श्रीलंकेनं या वर्ल्ड कपमधील एक मोठा विजय नोंदवला. झिम्बाब्वेचा त्यांनी 139 रननी पराभव केला. श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला तो तिलकरत्ने दिलशान. पहिली बॅटिंग करताना त्याने 131 बॉलमध्ये 144 रन केले. थरंगाच्या साथीने त्याने 282 रनची खणखणीत पार्टनरशिप केली. आणि टीमला 327 रनचा स्कोअर उभा करुन दिला. त्यानंतर झिम्बाब्वेनेही चांगली सुरुवात केली होती. आणि ब्रँडन टेलरच्या हाफ सेंच्युरीमुळे झिम्बाब्वेनेही बिनबाद 126 असं चोख उत्तर दिलं होतं. पण दिलशाननेच जादूई स्पेल टाकत झिम्बाब्वेचं आव्हान संपवलं. 3 ओव्हरमध्ये फक्त 4 रन देत त्याने तब्बल 4 विकेट घेतल्या. या धक्क्यानंतर झिम्बाब्वेच्या विकेट जात राहिल्या आणि अखेर त्यांची टीम 188 रनमध्ये ऑलआऊट झाली. मुरलीधरननं 3 तर अँजलो मॅथ्यूजनं 2 विकेट घेतल्या. या विजयाबरोबरचं लंकेनं आता ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली.

दरम्यान दिलशान आणि थरंगा यांनी आपल्या मॅरेथॉन इनिंगमध्ये पार्टनरशिपचा नवा रेकॉर्डही केला. वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशिप त्यांनी रचली. त्याशिवाय वन डेच्या इतिहासात ही चौथी मोठी पार्टनरशिप ठरली.

close