हसन अलीची जामिनावर सुटका

March 11, 2011 5:10 PM0 commentsViews: 2

11 मार्च

कोट्यवधी रुपयांच्या कर थकवल्याप्रकरणातील संशयित आरोपी हसन अली याची आज जामिनावर सुटका झाली. 75 हजारांच्या जामीनावर हसन अलीला सोडण्यात आलंय. इन्फोर्समेंट डिपार्टमेंटनं रिमांडची मागणी केली होती. मात्र, सेशन्स कोर्टाने ईडीची ही मागणी फेटाळली. हसन अलीच्या विरोधात अंमलबजावणी संचलनलायजवळ पुरावे नाहीत असा शेरा यावेळी कोर्टानं मारला. एखाद्या आरोपीच्या विरोधात पुरावे नसताना त्याला कशी काय अटक करण्यात आली अशी विचारणाही कोर्टानं केली. तसेच मुंबई न सोडण्याच्या अटीवर हसन अलीला जामीन दिला.

close