जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडणार -मोघे

March 11, 2011 10:10 AM0 commentsViews: 75

11 मार्च

गेल्या काही वर्षांपासून रखडलेलं जादुटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडलं जाईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. 13 कलमांचं हे विधेयक असेल. या विधेयकाबाबत असलेल्या विरोधकांच्या शंकाचं निरसन करण्यात आलेलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान हे विधेयक आपण कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही असं अलीकडेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष या विधेयकाबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.

close