चिनाय कॉलेजमध्ये युवा सेनेचा राडा

March 11, 2011 11:07 AM0 commentsViews: 4

11 मार्च

मुंबई येथील विले पार्ल्याच्या चिनाय कॉलेजमध्ये तोडफोड प्रकरणी आमदार अभिजीत अडसूळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिजीत अडसूळ यांच्यासोबत युवा सेनेच्या तीस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं चिनाय कॉलेजमध्ये सकाळी तोडफोड केली. साडेतीनशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना कॉलेजनं परीक्षेला बसू दिलं नाही. त्यावरून संतापलेल्या विद्यार्थ्यांसह युवा सेनेनं कॉलेजमध्ये तोडफोड केली. या विद्यार्थ्यांचा आजचा पेपर रद्द करण्यात आला.

close