कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात

March 11, 2011 12:11 PM0 commentsViews: 8

11 मार्च

फाग पंचमी म्हणजेच फाल्गून पंचमीच्या रात्री रत्नागिरीत अनेक ठिकाणी होळ्या उभारल्या जातात. रत्नागिरीतल्या झाडगाव भागातली ही होळी सावंत घराण्याने सुरू केलेली भैरीची होळी म्हणून ओळखली जाते. होळीसाठी शेवरीचं झाड आणून ते उभं केलं जातं. पुढचे पंधरा दिवस इथे रोज रात्री नमनखेळे, रोंबाट आणि होम करून भैरी देवाचा जागर केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही होळीच्या सणाला खास सुट्टी घेऊन मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे पुढचे पंधरा दिवस कोकणात होळीचा जागर आणि धुमशान सुरू राहणार असून होळी पौर्णिमेपर्यंत शिमग्याचा हा उत्साह टीपेला पोहोचणार आहे.

close