त्सुनामी म्हणजे नेमकं काय ?

March 11, 2011 5:36 PM0 commentsViews: 708

11 मार्च

गेल्या शंभर वर्षातला सर्वात मोठ्या पाचव्या भूकंपाची नोंद आज जपानमध्ये झाली. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 8.9 इतकी झाली होती. टोकिया शहरापासून समुद्रामध्ये 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याचा परिणाम सुनामीच्या रूपानं संपूर्ण टोकिया शहराला बसला.

भूकंपामधून निर्माण झालेल्या उर्जेमुळे पाण्याची पातळी वाढते आणि त्याचं रूपांतर त्सुनामीमध्ये होतं. समुद्रातल्या लाटांच्या प्रवाहापेक्षा याची उंची जास्त असते. जेव्हा या लाटा आपली पातळी सोडतात. तेव्हा दिसणारे चित्र हे असं असतं. रस्त्यावर असलेल्या कार, समुद्रातल्या जहाजा इमारती हे सगळं त्याच्या आवाक्यात येतं. लाटांची ही उंची साधारणतः 13 फूट उंच इतकी होती. पॅसिफिक महासागराच्या कक्षेत येणार्‍या 13 देशांना या सुनामीचा फटका बसू शकतो, असा इशारा देण्यात आला.

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओसिएयन इन्फोर्मेशन सर्व्हिसेस अर्थात इनक्वॉईस सध्या त्यादृष्टीनं तयारी करतेय. 2004 ला भारतात आलेल्या सुनामीनंतर यासंस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून दररोज चोवीस तास इथले इंजिनिअर्स भूकंपाची नोंदणी आणि त्यादृष्टीनं किनारपट्टीवरच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून काम करताहेत. हे सेंटर जगभरातल्या 300 केंद्रांना जोडलं गेले. त्यामुळे तिथली सगळी माहिती इथं उपलब्ध होते.

त्सुनामी सारखी कुठलीही घटना घडली तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापने त्याठिकाणी पहिल्यांदा पोहचण्याची सगळी तयारी केलेली आहे. पण राजधानी दिल्ली मात्र यादृष्टीनं अजूनही जागी झालेली दिसत नाही. जपान हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने त्यांनी तिथली व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत सर्व तयारी केलीय. पण जपानच्या त्सुनामी सारखं संकट जर भारतात आलं तर भारत त्यादृष्टीनं पूर्णपणे तयार आहे हा खरा प्रश्न आहे..

close