गर्भनिरोधक गोळ्यांच्या खुल्या विक्रीवर बंदी ; लवकरच अंमलबजावणी

March 11, 2011 2:59 PM0 commentsViews: 21

11 मार्च

स्त्री भ्रूणहत्या आणि गर्भलिंग परिक्षण समस्येबाबत राज्य सरकारने सुपरवायझरी समितीची नेमणूक केली आहे. समितीची पहिली बैठक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांवर कशा प्रकारची बंधनं असावीत याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना एक महिन्याच्या आत देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गर्भनिरोधक गोळ्या आणि औषधांच्या खुल्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची याचाही विचार लवकरच केला जाईल. अशी माहिती आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.

close