मराठी- हिंदी साहित्यातील दुवा रमेश यादव

November 7, 2008 12:21 PM0 commentsViews: 5

7 नोव्हेंबर, मुंबईशिल्पा गाड' महाराष्ट्राची लोककला ' या विषयासाठी फेलोशिप. 50 वर्षांची परंपरा असणार्‍या विवेकानंद व्याख्यानमालेत लहानपणापासुन सहभाग हे सगळं करणारं कुणी मराठी आडनावाची व्यक्ती नाही. त्यांचं नाव रमेश यादव आहे. अस्खलित मराठी भाषा. मराठीतुन निवेदनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. त्यांचा जन्म मुंबईतलाच पण मूळ गाव गोरखपूरअसलं तरी आता ते पक्के मुंबईकर झाले आहेत.डॉ.गोपाळ देशपांडे यांनी 1987मध्ये लिहिलेल्या ' वैकल्य ' या कादंबरीचा हिंदी अनुवाद रमेश यादव यांनी केला. त्यांचा हा प्रयत्न हा मराठी हिंदीतली दरी सांधण्याचाच एक प्रयत्न आहे. मराठी साहित्य त्यांनी भरपूर वाचलंय. सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल ते म्हणाले, ' मला वाटतं की, मराठी- हिंदी हा वाद गैरलागू आहे. कारण आता आम्ही इतकी वर्ष मुंबईत राहतोय. त्यामुळे हे चुकीचंच आहे '.रमेश यादव यांच्या घरात मराठीपण जपलं जातं. तेही मर्‍हाटमोळ्या पद्धतीनं. 'आमच्या घरी आम्ही दिवाळी साजरी करतो. मुलांचं बारसं मराठी पद्धतीनं करतो ',असं यादव म्हणाले. मराठी -उत्तरप्रदेश हा वाद अद्यापही संपलेला नसला तरी रमेश यादव हे ही दरी सांधण्याचं उत्तम उदाहरण आहे.

close