जपानमध्ये बळींची संख्या 1600 च्यावर

March 12, 2011 9:13 AM0 commentsViews: 84

12 मार्च

महाभयंकर भूकंपाने जपान हादरून गेलं आहे. भूकंपानंतर सुनामी आल्याने तिथं मोठी हानी झाली. या आपत्तीत आतापर्यंत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहेत. तर 805 लोक बेपत्ता झाले आहेत. तर मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपात 10 हजार लोक विस्थापित झाले आहेत. अजूनही अनेक नागरिक कोसळलेल्या बिल्डिंगच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत. गेल्या शंभर वर्षातला हा सर्वात मोठा भूकंप आहे. या भूकंपात किती नुकसान झालं याचा अजूनही अंदाज लागत नाही. मात्र जपान सरकारनं अमेरिकेला मदतीचं आवाहन केलं आहे त्याचबरोबर खुद्द जपानमधल्याही मदत यंत्रणा युद्धस्तरावर मदतकार्य करत आहे. भूकंपाच्या 8.9 रिश्टर स्केलच्या धक्यांनंतर आतापर्यंत तिथं सुमारे 155 ''आफ्टर शॉक्स'' बसले आहेत. दरम्यान या भूकंप आणि सुनामीचा फटका आता जपानी अर्थव्यवस्थेला बसतोय. जपानमधल्या सोनी, टोयोटा, निसान, होंडा या सगळ्या मोठ्या कंपन्यांसकट इतरही अनेक कंपन्यांचे प्रकल्प ठप्प झालेत. या प्रकल्पांमधील उत्पादन थांबवण्यात आलंय.

अणुकेंद्रात किरणोत्सर्ग ; 10 किलोमीटरचा परिसर केला रिकामा

जपानमधल्या फुकूशीमा अणुकेंद्रात किरणोत्सर्ग झाला. टोकियो इलेक्ट्रीक पॉवर कंपनीच्या 1 नंबरच्या प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात चार जण जखमी झालेत. या स्फोटाचं कारण अद्यापही कळू शकलं नाही. पण अधिकारी याचा युद्धपातळीत शोध घेत आहे. या स्फोटानंतर परिसरात सिझीयम हा किरणोत्सारी पदार्थ आढळला. अशी अधिकृत माहिती जपानाच्या अधिकार्‍यांनी दिली. त्याचबरोबर डॉक्टरची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. कालपासून या परिसरातल्या 3 हजार लोकांना हलवण्यात आलंय. तर प्रकल्पाच्या आसपासच्या सुमारे 45 हजार लोकांना हलवण्याची शक्यता आहे. दरम्यान गळती मोठी नाही अशी माहिती जपानी अधिकार्‍यांनी दिली.

close