सोलापूरमध्ये वाळू माफियांकडून पोलीस पाटलाच्या भावाची हत्या

March 12, 2011 9:25 AM0 commentsViews: 4

12 मार्चसोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या टेंभुर्णीत वाळू माफियांनी इथल्या पोलीस पाटलाच्या भावाची निर्घृण हत्या केली. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती दिली. हा राग मनात ठेवून वाळू माफिया विकास म्हस्के यानं अरुण म्हस्के यांची हत्या केली. इंडिका गाडी अंगावर घालून त्यानंतर तलवारीनं वार करून ही हत्या करण्यात आली. आरोपी विकास म्हस्के हा राष्ट्रवादीचा उपसरपंच आहे. त्याच्याविरुद्ध टेंभूर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यान, आरोपी विकास म्हस्के हा फरार झाला आहे.

close