नागपूरमध्ये भरदिवसा विद्यार्थीनीची हत्या

March 12, 2011 9:38 AM0 commentsViews: 4

12 मार्च

नागपुरातील नंदनवन भागात एका विद्यार्थिनीवर चाकुने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात या तरूणीचा मृत्यू झाला आहे. नागपुरातल्या नंदनवन भागातल्या केडीके इंजिनियरिंग कॉलेजच्या तिसर्‍या वर्षाला शिकणार्‍या मोनिका या विद्यार्थीनीवर हा हल्ला झाला. कँपसच्या बाहेरच मोनिका रस्त्यावरून जात असताना बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी या विद्यार्थीनीवर चाकूने हल्ला चढवला. त्यात ती गंभीर जखमी झाली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

भरदिवसा तरुणीवर अशाप्रकारे हल्ला झाल्यानं परिसरात खळबळ माजली. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत असून अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पण खून होण्याआधी मोनिकाला तिच्या मैत्रिणीसोबत बघण्यात आलं होतं. त्यामुळे पोलीस आता तिच्या मैत्रिणीची चौकशी करत आहेत. तसेच मोनिकाचा मोबाईल फोनही घटनास्थळावरून गायब आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला मदत करून तिला वाचवण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही. दुदैर्वानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती तरुणीही काहीच सांगू शकली नाही.

close