श्रीकांत सरमळकर पुन्हा शिवसेनेत

March 12, 2011 10:00 AM0 commentsViews: 17

12 मार्च

राणे समर्थक श्रीकांत सरमळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नारायण राणेंना एक झटका बसला असल्याचे बोललं जातंय. सरमळकर यांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मातोश्रीवर त्यांचं स्वागत केलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले जे महत्वाचे नेते आणि आमदार होते. त्यापैकी श्रीकांत सरमळकर हे एक होते. शिवसेनेत परतल्यानंतर जी जबाबदारी शिवसेनाप्रमुख देतील ती जबाबदारी नीट पार पाडू अशी भावना श्रीकांत सरमळकर यांनी व्यक्त केली. आज शिवसेनेचा भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

close