आयबीएन लोकमतच्या टीमवर हल्ला

March 12, 2011 10:40 AM0 commentsViews: 8

12 मार्च

अलिबाग तालुक्यातील मुरूड जंजिरा येथील एकदरा गावामध्ये हनुमान मच्छीमार सहकारी व्यावसायिक संस्थेचे माजी अध्यक्ष मोतिराम चाया पाटील यांच्याकडून गावातील 40 कुटुंबावर अन्याय होत असल्याची तक्रार या ग्रामस्थांनी आयबीएन लोकमतकडे दिली होती. त्यानुसार दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकूण बातमी करण्यासाठी गेलेल्या आयबीएन लोकमतच्या टीमवर तिथल्या महिलांनी हल्ला केला.

तसेच आमचा कॅमेराही या महिलांनी हिसकावून घेतला. आणि त्याची मोडतोड करण्यात आली. शूटिंग केलेली टेपही गायब करण्यात आली. एवढंच नव्हे तर आयबीएन लोकतचा बूम माईक आणि लोगो आयडीही या महिलांनी गायब केला. आमची प्रतिनिधी अलका धुपकर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार हे सकाळी अकरा वाजता एकदरा गावामध्ये पोहचले. मोहन जाधव हा आमचा अलिबागच्या रिपोर्टर सुद्धा या टीमसोबत होता.

दोन तास तक्रारदारांचं शूटिंग करुन आमची टीम दुसर्‍या बाजूचं म्हणणं जाणून घेण्यासाठी मोतिराम चाया पाटील याच्या घराच्या दिशेने गेली. तिथं मोतिराम अध्यक्ष असलेल्या हनुमान सहकारी संस्थेच्या बोर्डचं शूटिंग आमच्या टीमने केलं. त्याचवेळी महिलांचा एक जमाव या टीमवर आणि आमच्या टीमसोबत असलेल्या स्थानिक तक्रारदारांवर धाऊन आला. शूटिंग का करता? असं म्हणून त्या महिला आमच्या टीमच्या अंगावर धाऊन आल्या. नेमक याचं वेळी स्थानिक पत्रकार किरण बाथम हे मदतीस धावून आले. त्यानंतर कॅमेरा बंद करुन आमची टीम तिथून निघाली. पण या महिलांचे तीन मोठे जमाव आमच्या टीमच्या आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या अंगावर धाऊन आले. जगदीश दामशेठ या मच्छीमारावर दगडफेक करण्यात आली. त्याने त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. तर रश्मीकांत चंद्रकांत पाटील याच्या अंगावर महिलांच्या जमावाने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर लाथांनी मारहाण करण्यात आली. त्याला अलिबागच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली. या घटनेचं एफआयआर मुरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.

कोण आहे मोतीराम चाया पाटील?

- डिझेल माफिया- एकदरा येथील हनुमान मच्छीमार व्यावसायिक सहकारी संस्थेचा माजी अध्यक्ष -शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता-याआधी काँग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता -एकदरा गावचा कोळी समाजाचा अध्यक्ष- मोतीरामच्या हद्दपारीचा पोलिसांचा प्रस्ताव- आयपीसी कलम 147,143, 451, 427, 232, 504. 506, 395 नुसार मोतीरामवर गुन्हे दाखल

मुरुडचा माफिया कधी होणार हद्दपार ?

- मोतीराम चाया पाटलाविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर- जिल्हाधिकारी कार्यालयानं 24 डिसेंबर 2010 ला मंजूर केला होता प्रस्ताव- हा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला- मात्र अडीच महिन्यांनंतरही प्रस्तावावर निर्णय नाहीमोतीरामची दहशत

- हनुमान मच्छीमार संस्था बरखास्त करुन त्यावर प्रशासकाची नियुक्ती- संस्थेचं संचालक मंडळही बरखास्त – मनमानी कारभार, भ्रष्टाचार आणि अधिकार पदाचा दुरुपयोग यामुळे सहाय्यक निबंधकांनी केली कारवाई- पण प्रशासकाला गावात पाऊल ठेऊ दिलं जात नाही- प्रशासक कारभार हातात घ्यायला आले तेव्हा त्यांच्यावरही महिलांच्या जमावाच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला

हनुमान संस्थेच्या प्रशासक मंडळची कार्यकारी

1) गणेश सुदाम पुगावकर, शाखाधिकारी- रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा मुरुड- प्रशासक मंडळाचे अध्यक्ष2) श्रीकांत विनायक वारुंजीकर, परवाना अधिकारी, मुरुड- उपाध्यक्ष, प्रशासक मंडळ3) राजेंद्र बाळू गावडे, प्रतिनिधी, जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ, मर्यादित अलिबाग- सदस्य प्रशासक मंडळया संस्थेचा दमदाटीचा कारभार

- रेशन दुकानही मोतिरामच्या अधिपत्याखाली- गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोतिराम विरोधकांना अर्जही भरु देत नाही- मोतिरामचं पॅनेल बिनविरोध निवडून येतं-मोतिराम ग्रामपंचायतीचा माजी सरपंच-यावेळी ग्रामपंचायतीवर कारवाई करुन बरखास्त करण्यात आली- ग्रामपंचायतीवरही प्रशासक आहे-पण प्रशासकाला मोतिराम आणि त्याचे पाठीराखे गावात येऊ देत नाहीत- गावच्या 24 बोटींचा डिझेलचा कोटा मोतिराम उचलतो-त्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप- अस्तित्वात नसलेल्या बोटींच्या नावे कोटा उचलला जातो- मच्छीमारांना सरकारक़डून मिळणारा डिझेलाचा संपूर्ण परतावा दिला जात नाही- एकदरा गावामध्ये हनुमान मच्छीव्यावसायिक सहकारी संस्थेला -मत्सव्यवसाय खात्याने 30.30 गुंठे जागा लीजवर दिली- या जागेवर हनुमान संस्थेचा अध्यक्ष मोतिराम चाया पाटील याने अतिक्रमण केलंय- स्वत:चं घरं बांधलंय- याबाबत सहाय्यक मत्स्यव्यवसाय संचालकांनी अहवाल देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही- सदर इसमाकडून जनतेच्या जिवितास व शांततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे' ही वाक्यं आहेत पोलिसांनी प्रांताकडे पाठवलेल्या हद्दपारी प्रस्तावात लिहिलेलं आहे.

मोतीराम पाटलाची हद्दपारी कुणी केली रद्द ?

-याआधी मोतीराम चाया पाटील याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव -2 मार्च 2009 ला 2 वर्षांसाठी मोतीराम पाटलाच्या हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर-त्या हद्दपारीच्या प्रस्तावावर मोतीराम पाटलानी मंत्रालयात अपील केलं-केवळ 2 महिन्यांत मोतीरामची हद्दपारी रद्द -27 एप्रिल 2009 ला मंत्रालयातील आदेशानुसार हद्दपारी रद्द- तत्कालीन प्रधान सचिव ऍना दाणी यांनी हद्दपारीचा आदेश केला रद्द- प्रांताधिकार्‍यांनी हद्दपारीचे आदेश मान्य करताना 15 महिने उशीर केला, असं कारण दिलं – स्थानिक प्रशासनाने हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करायला उशीर केला- वेळकाढूपणाचा मोतीरामला फायदा झाला- 14/ 11/ 2007 ला प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठवला – त्यावर मार्च 2009 ला कारवाई झाली

close