शिवसेनेचा विरोध झुगारून ऐश्वर्या राय बच्चन संमेलनाला हजर

March 12, 2011 9:56 AM0 commentsViews: 15

12 मार्च

शिवसेनेचा विरोध झुगारून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कन्नड विश्व साहित्य संमेलनात उपस्थित राहिली. कालपासून बेळगावच्या के.एन. मैदानावर कन्नड विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. बेळगावात मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारनं अन्याय चालवला. त्यांची मुस्कटदाबी करण्यात येतीय. त्यामुळे ऐश्वर्यानं या संमेलनाला उपस्थित राहू नये असं आवाहन शिवसेननं केलं होतं. पण तरीही या संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी ऐश्वर्या बेळगावात आली होती. यावेळी उद्योगपती नारायण मुर्तीही हजर होते. त्यापूर्वी कन्नड विश्व साहित्य संम्मेलनाच्या निमित्ताने केळकर बागेतल्या 400 हून अधिक गाळ्यांवर बुलडोझर फिरवण्यात आले. अचानक बेळगाव महानगर महापालिकेनं ही कारवाई केल्याने मराठी भाषिकांमध्ये असंतोष पसरला. त्यांचा विरोेधही दडपुन टाकण्यात आला. तसेच मराठी पाट्याही सक्तीनं उतरवण्यात आल्या आहेत.

close