आयबीएन लोकमतच्या पत्रकारांवर हल्ल्याचा निषेध – हर्षवर्धन पाटील

March 12, 2011 2:36 PM0 commentsViews: 10

12 मार्च

मुरूड जंजिरा तालुक्यातील मुरुड येथील एकदरा गावामध्ये आयबीएन लोकमतच्या पत्रकारांवरील हल्ल्याचा संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निषेध केला. पत्रकारांवरील हल्ल्यांविरूध्द कायदा करण्याचे विधेयक सरकार लवकरच आणेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुरूड जंजिरा तालुक्यातील मुरुड येथील एकदरा गावामध्ये हनुमान मच्छीमार सहकारी व्यावसायिक संस्थेचे माजी अध्यक्ष मोतिराम चाया पाटील यांच्याकडून गावातील 40 कुटुंबावर अन्याय होत असल्याची तक्रार या ग्रामस्थांनी आयबीएन लोकमतकडे दिली होती. या घटनेची बातमी कऱण्यासाठी आयबीएन लोकमतच्या आमची प्रतिनिधी अलका धुपकर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार आणि आमचा अलिबागचा रिपोर्टर मोहन जाधव सुद्धा या टीमसोबत गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली.

close