जपानमधील फुकूशिमा अणुकेंद्रात स्फोट

March 12, 2011 4:56 PM0 commentsViews: 1

12 मार्च

जपानमधल्या फुकूशीमा अणुकेंद्रातल्या किरकोळ किरणोत्सर्गानंतर आता स्फोटही झाला. टोकियो इलेक्ट्रीक पॉवर कंपनीच्या 1 नंबरच्या प्लांटमध्ये स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचं कारण अद्यापही कळू शकलं नाही. पण अधिकारी याचा युद्धपातळीत शोध घेत आहे. या स्फोटानंतर परिसरात सिझीयम हा किरणोत्सारी पदार्थ आढळला.

अशी अधिकृत माहिती जपानाच्या अधिकार्‍यांनी दिली. त्याचबरोबर डॉक्टरची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहेत. कालपासून या परिसरातल्या 3 हजार लोकांना हलवण्यात आलंय. तर प्रकल्पाच्या आसपासच्या सुमारे 45 हजार लोकांना हलवण्याची शक्यता आहे. दरम्यान गळती मोठी नाही, तसेच स्फोटही गंभीर स्वरुपाचा नाही अशी माहिती जपानी अधिकार्‍यांनी दिली. अजूनही भूकंपानंतरचे धक्के इथे जाणवत आहे. काहीच वेळा पूर्वी 6.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जपानला जाणवला.

close