पी.जे.थॉमस यांची सुप्रीम कोर्टात फेरयाचिका

March 12, 2011 5:01 PM0 commentsViews: 2

12 मार्च

केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त पी जे थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल केली. आपली नियुक्ती रद्दबातल ठरवल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रकरणी आता पाच न्यायमुतीर्ंच्या खंडपीठानं सुनावणी करावी अशी मागणी थॉमस यांनी केली. त्रीसदस्यीय खंडपीठानं दिलेल्या निर्णयावर समाधानी नसल्याचे सांगत थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल केली. यापुर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेतही या नियुक्तीत त्रुटी झाल्याचं मान्य करत नियुक्ती रद्द केली.

close