गर्जा महाराष्ट्र आणि आरती कुलकर्णी यांना मटा सन्मान पुरस्कार

March 12, 2011 6:06 PM0 commentsViews: 3

12 मार्च

दरवर्षी देण्यात येणार्‍या म.टा.सन्मान 2011 पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं. आयबीएन लोकमतला यावर्षी यात दोन पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट स्त्री सुत्रधार हा पुरस्कार मिळाला आमच्या असोसिएट एडिटर आरती कुलकर्णी यांना तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम ठरला ‘गर्जा महाराष्ट्र’.

आयबीएन लोकमतच्या लोकप्रिय कार्यक्रम गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमाला अलीकडे सर्वोत्कृष्ट व्हिडिओ संकलनचा बीगीज बी हा पुरस्कार मिळाला होता. तर यावर्षी गर्जा महाराष्ट्रला मटा सन्मान सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच आमच्या असोसिएट एडिटर आरती कुलकर्णी यांना ‘अतुलच्या देवराई’ या कार्यक्रमासाठी मटा सन्मान 2011 सर्वोत्कृष्ट स्त्री सुत्रधार हा पुरस्कार मिळाला आहे.

close