फुकूशीमा अणुप्रकल्पात पुन्हा स्फोट

March 14, 2011 9:02 AM0 commentsViews: 2

14 मार्चजपानमधील फुकूशीमा अणुप्रकल्पात पुन्हा एकदा स्फोट झाला. हा स्फोट आता रिएक्टर क्रमांक तीन मध्ये झाला आहे. या अणुप्रकल्पातून धुराचे लोटही निघत आहेत. यापूर्वी रिऍक्टर क्रमांक एकमध्ये स्फोट झाला होता. त्यामधून किरणोत्सार झाला होता. त्यावर मात करण्याचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. रिऍक्टर्स थंड करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जातोय. दरम्यान पहिल्या रिऍक्टरमधून झालेल्या किरणोत्सर्गामुळे अठरा जणांना बाधा झाली आहे. तर 160 जणांची तपासणी करण्यात आली. अणुकेंद्राच्या वीस किलोमीटर परीसरातल्या दोन लाख लोकांना तिथून हलवण्यात आलंय.

close