पुण्यातून सुरू झालेली दांडी यात्रा बुधवारी मंत्रालयावर धडकणार

March 14, 2011 7:58 AM0 commentsViews: 8

14 मार्च

राज्याच्या कानाकोपर्‍यातल्या प्रकल्पग्रस्तांची दांडी यात्रा बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली येत्या 16 तारखेला मंत्रालयावर धडकणार आहे. आता ही दांडी यात्रा लोणावळ्याच्या पुढे आली आहे. रत्नागिरीपासून भंडार्‍यापर्यंतचे शेकडो प्रकल्पग्रस्त या यात्रेत सहभागी झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, निर्वाह भत्ता तसेच अतिरिक्त जमीन शेतकर्‍यांना परत मिळावी अशा अनेक मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी हा मोर्चा काढला आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून सुरू झालेला हा लाँग मार्च बुधवारी विधान भवनावर धडकणार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी हा दांडी यात्रा काढलीय.

close