आलम आरा ‘गुगल’वर !

March 14, 2011 10:45 AM0 commentsViews: 2

14 मार्च

भारतीय सिनेसृष्टीतला पहिला बोलपट आलम आराला आज 80 वर्ष पूर्ण झाली. 14 मार्च 1931 ला रिलीज झालेल्या या रोमँटिक सिनेमाचे दिग्दर्शन अर्देशीर इरानी यांनी केले होते. मास्टर विठ्ठल, झुबेदा, एल व्ही प्रसाद आणि पृथ्वीराज कपूर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या पहिल्या बोलपटात एक गाणं सुध्दा चित्रित करण्यात आले होते. खेदाची गोष्ट अशी की या सिनेमाची ओरिजनल प्रिंट मात्र सध्या उपलब्ध नाही. 2003 साली पुण्यातल्या नॅशनल फिल्म अर्काइव्हला लागलेल्या आगीत आलम आराच्या प्रिंटचे नुकसान झाले होते. आता गुगल साईटने आपल्या होमपेजवर आलमआरा सिनेमाला 80 वर्ष पूर्ण होण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

close