मराठीचा उगम कन्नड भाषेतूनच !

March 14, 2011 11:03 AM0 commentsViews: 9

14 मार्च

'टबेळवाडी मालाम्मा या कन्नड राणीने शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले होते. त्यामुळेच ते मराठी सत्ता स्थापन करू शकले. कन्नड भाषेतूनच मराठी भाषेचा उगम झाला असून पूर्वी मुंबईतही कन्नड भाषाच होती', 'असा जावई शोध लावलाय' कन्नड साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार पाटील पुटप्पा यांनी बेळगावात आयोजित विश्व कन्नड संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. नुकताच सीमाप्रश्नी महाराष्ट्र उध्दट भूमिका घेत असल्याचा आरोप कर्नाटक विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांनी केला होता आणि आता पाटील पुटप्पा यांनी तर मराठी भाषेच्या उगमावरुनच मुक्ताफळे उधळली आहेत. पाटील पुटप्पा यांनी हा जावाई शोध लावला आहे.गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या विश्व कन्नड संम्मेलनाचा नुकताच समारोप करण्यात आला.

close