अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची नाचक्की !

March 14, 2011 2:26 PM0 commentsViews: 1

14 मार्च

जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अध्यादेश 2011 राज्य सरकारने विधानसभेत मांडले. पण त्याचवेळी समान तरतूदी असलेलं जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विधेयक मात्र मागे घेतलं यावर शेकपाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख आणि भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन सरकारला धारेवर धरलं. एकच मांडणं आणि नंतर मागे घेणं हे चुकीचं आहे असं गणपतराव देशमुख यांचं म्हणणं होतं. तर पाण्याचे अधिकार प्राधिकरणाकडून काढून मंत्र्यांच्या हातात देण्यासाठीच हे विधेयक आहे. या विधेयकाचा वापर सोफिया पॉवर प्लांटला पाणी देण्यासाठीच करण्यात येत आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना नवं विधेयक रोखून ठेवावं लागलं. पण पहिल्या विधेयकाची मुदत संपली असल्याने दुसरे विधेयक मांडले असल्याचे स्पष्टीकरण संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलं. या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारला पहिल्याच दिवशी विधेयक मांडण्यावरुन बॅकफूटवर जावे लागलं.

close