‘आदर्श’मध्ये शिवाजी काळेंचा फ्लॅट हा अजित पवारांचा – मुंडे

March 14, 2011 2:41 PM0 commentsViews: 4

14 मार्च

राज्यातल्या माफियांच्या विरोधात भाजपनं 14 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु केलं होतं आणि आज मोर्चा मंत्रालयावर धडकला. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयावर दाखल झालेल्या या मोर्चात भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरीही सामील झाले. यावेळी आझाद मैदानात झालेल्या भाषणात भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गडकरींनी पी. जे. थॉमस प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनादेखील लक्ष्य केलं. आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असलेल्या शिवाजी काळेंची संपत्ती ही अजित पवारांची आहे असा आरोपही गोपीनाथ मुंडे यांनी केला.

close