पोलीस पाटलाच्या भावाची हत्या करणार्‍या दोघांना अटक

March 14, 2011 2:49 PM0 commentsViews: 2

14 मार्च

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात टेंभूर्णी इथं पोलीस पाटलाच्या भावाची निर्घृणपणे हत्या करणार्‍या वाळू माफियाला त्याच्या दोन साथीदारांसह टेंभूर्णी पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपूर्वी अरूण म्हस्के या शेतकर्‍याची वाळूमाफियांनी तलवार भोसकून हत्या केली होती. मुख्य आरोपी विकास म्हस्के याच्यासोबत विनोद म्हस्के आणि किरण म्हस्के या तिघांना अटक करण्यात आली असून 17 मार्चपर्यंत माढा कोर्टानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती दिली. हा राग मनात ठेवून वाळू माफिया विकास म्हस्के यानं अरुण म्हस्के यांची हत्या केली होती. इंडिका गाडी अंगावर घालून त्यानंतर तलवारीनं वार करून ही हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला आरोपी विकास म्हस्के हा राष्ट्रवादीचा उपसरपंच आहे.

close