दारु विक्रेत्यांनी काढला मोर्चा

March 14, 2011 3:53 PM0 commentsViews: 11

14 मार्च

दारुबंदीसाठी आणि दारुविक्रेत्यांविरुध्द मोर्चे काढतांना तूम्ही नेहमीच बघितलं असेल. मात्र चंद्रपुरात चक्क आज दारु विक्रेत्यांनी मोर्चा काढला. खोटी आकडेवारी प्रसिध्द करुन जिल्हात दारुबंदीचा घाट घातल्या जात असल्याचे या मोर्चेकर्‍यांचं म्हणणं आहे. जिल्हातील बार असोसिएशनचे जवळपास 8 हजार पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हातील दारु विक्रीमुळे शासनाला 160 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते आणि जवळपास 60 हजार लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या उद्योगावर अवलंबून आहेत अस असोसिएशनचं म्हणणं आहे.

close