सेन्सेक्स 9, 964 वर बंद

November 7, 2008 1:51 PM0 commentsViews: 5

7 नोव्हेंबर, मुंबईएशियन मार्केटसमध्ये सुधारणा झाल्यानंतर आज भारतीय शेअर मार्केटस्‌मध्ये रिकव्हरी दिसली. आठवड्याच्या अखेरीस सेन्सेक्स 230 अंशांनी वधारुन 9 हजार 964 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीतही आज तेजी जाणवली. शेवटच्या सत्रात निफ्टी 80 अंशा वर जाऊन 2,973 च्या स्तरावर बंद झाला.आज ऑईल, मेटल आणि रिअल्टी सेक्टरमध्ये विशेष तेजी दिसली. टॉप गेनर्समध्ये रिलायन्स इन्फ्रा, हिंडोल्को, रिलायन्स कम्युनिकेशन आणि टीसीएस हे शेअर्स आहेत. टॉप लुजर्समध्ये महिन्द्रा अ‍ॅण्ड महिन्द्रा, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझकी आणि ओएनजीसी हे शेअर्स आहेत.

close