अजितदादांच्या हस्ते जगदीश खेबुडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

March 14, 2011 5:06 PM0 commentsViews: 6

14 मार्च

'हळूहळू काका मीडियाला गोंजारू लागले, अन रूसलेले कॅमेरे पुन्हा डोळा मारू लागले..' वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केलं आणि अजितदादांनीही दिलखुलास दाद दिली . एवढंच नाही तर आपण कवी नसलो तरी कवितेला दाद देता येते असं सांगत पाडगावकरांच्या जिप्सी, सुरेश भट , बहीणाबाई चौधरींच्या कविता तसेच भाऊसाहेब पाटणकरांचा शेरही सादर केला. प्रकाश डेरे चॅरीटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित कवी संमेलनात ते बोलत होते. जगदीश खेबुडकर यांना जीवनगौरव पुरस्कार तर पुष्पाग्रज, ऐश्वर्य पोटकर, कल्पना दुधाळ यांच्या काव्यसंग्रहांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

close