भारत वर्ल्ड कप जिंकल्यास प्रत्येक खेळाडूंना कार भेट !

March 14, 2011 5:08 PM0 commentsViews: 6

14 मार्च

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा फिव्हर वाढू लागला आहे. भारताने जेतेपद पटकावत 1983 च्या वर्ल्ड कप विजयाची पुनरावृत्ती करावी अशी सर्वच क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.पुण्यातल्या समृध्द जीवन फाउंडेशनने तर भारतीय टीमसाठी एक योजनाच आखली आहे. भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला नवी कोरी कार देण्याची फाउंडेशननं ठरवलं आहे. याशिवाय टीमला शुभेच्छा देण्यासाठी सह्यांची मोहीमही राबवली जात आहे. यासाठी भारताचे माजी कॅप्टन चंदू बोर्डे यांच्या अद्यक्षतेखाली 'आम्ही पुणेकर समृद्द जीवन गौरव समितीची' स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल तसेच अभिनेता भरत जाधवचा समावेश आहे.

close