जपानमध्ये मृतांची संख्या 10 हजारांवर

March 14, 2011 5:42 PM0 commentsViews: 59

14 मार्च

जपानमध्ये झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे मरण पावलेल्यांचा आकडा आता दहा हजारांच्या पुढे गेला. ओसाकामधील अजून दहा हजार लोक बेपत्ता आहेत. मियागीमध्ये आज दोन हजार मृतदेह मिळाले. तिथेही सुमारे दहा हजार लोक पाण्यात वाहून गेले असल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दुपटीपेक्षा जास्त वाढू शकतो. पण अजूनपर्यंत जपान सरकारनुसार मृतांची संख्या केवळ दोन हजार आहे. जपानच्या पंतप्रधानांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं की दुसर्‍या महायुद्धानंतर देशावर कोसळलेलं हे सगळ्यांत मोठं संकट आहे. जिवंत असलेल्या लाखो लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल होत आहे. त्यात तापमान दोन अंशांवर पोचल्यानं परिस्थिती बिकट झाली आहे.

फुकुशिमा अणुप्रकल्पात दुसरा स्फोट

जपानला त्सुनामीचा फटका बसल्यानंतर तिथल्या अणुप्रकल्पातली स्थिती अतिशय बिकट झाली आहे. फुकुशिमा दायची इथल्या अणुप्रकल्पात हायड्रोजनचा दबाव वाढल्यामुळे आज दुसरा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर त्या परिसरातल्या जवळपास 2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. आणखीही काही जणांना युद्धपातळीवर हलवण्याचे प्रयत्न जपान सरकारकडून केले जात आहेत. फुकुशिमा मधल्या रिऍक्टर नं 3 जवळ आज सकाळी स्फोट झाला. तर दोन नंबरच्या प्लांटचं कुलिंग यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे अणुभट्‌ट्यांमधील तापमान मोठ्याप्रमाणात वाढलंय. पण एवढं होऊनही अजूपर्यंत सर्व अणुभट्‌ट्या सुरक्षित आहेत. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचा किरणोत्सर्ग झाला नसल्याचा दावा जपानी अधिकार्‍यांनी केला आहे. पण तापमान असंच वाढत राहिलं तर अणुभट्टीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते.

फुकुशिमा प्रकल्पामध्ये शनिवारपासून झालेला हा दुसरा स्फोट आहे. दरम्यान या स्फोटामुळे किरणोत्सर्गाचा धोका वाढला आहे. पण त्याचा इतक्या लवकर आरोग्यावर कोणताही परिणाम होताना दिसणार नाही असा दावा जपान सरकारनं केला आहे. या परिसरातील सर्वजण सुरक्षित असल्याचा दावाही जपानी सरकारनं केला.

पण लोकांना मात्र याबाबत कुठलीही श्वासवती वाट नाही. त्यामुळे त्यांच्या मनातली भीती मात्र अजूनही कायम आहे. दरम्यान अणुप्रकल्पातून होत असलेल्या किरणोत्सर्गाचा धोका वाढतच चालला आहे. पण सध्या तिथं वाढलेल्या तापमानावर नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रकल्पाला लागलेली आग विझवण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जातोय.

महाप्रलंयकारी भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीनं तिथली विद्युत सेवा विस्कळीत झालेली आहे. पण त्याही वर त्सुनामीच्या फटक्यामुळे तिथली जनरेटर व्यवस्थाही कोलमडली आहे. त्यांच्या बॅटरी बॅकअप असल्याचंही बोललं जातंय. पण सुनामीच्या तडाख्यानंतर त्याची तीव्रता किती राहिली असेल यावर बरेच प्रश्नचिन्ह उभी राहिलेत. दरम्यान जगभरातल्या 70 देशांनी जपानला या आणीबाणीच्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला.

अणुऊर्जा प्रकल्पाची सद्यस्थिती –

- जपानमधल्या 5 ही अणुभट्‌ट्यांची कुलिंग यंत्रणा बंद पडली- फुकुशिमाच्या तिसर्‍या प्लांटमध्ये होतोय हायड्रोजनचा स्फोट- सामान्य स्थितीच्या हजारपटीनं जास्त किरणोत्सर्ग होतोय- किरणोत्सर्गाचं आरिष्ट कोसळण्याची भीती- जपानच्या भूकंपात एकूण 170 बिलियन डॉलर्सचं नुकसान

किरणोत्सर्गामुळे होणारे परिणाम

-सुरवातीला उलट्या दोखेदुखी ताप जाणवतो.- कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता- संततीमध्ये अपंगत्व येणे- अविकासीत मेंदू डोक्याचा आकार लहान आणि अविकसीत डोळे असणे- दोन ते तीन पिढ्यांवर दुरगामी परिणाम- लहान मुलांना थाईराईडचा कर्करोग होण्याची शक्यता- अती किरणोत्सारामुळे जीवीतहानीही संभवते

लोकांनाची सुरक्षिता

- अणुभट्टीच्या दहा किमी परिसरातील 45 हजार नागरीकांना येथून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आलेत.- प्रकल्पाच्या 200 किमी परिसरात नागरिकांना येण्यास बंदी आहे.- साडे तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

प्रतिबंधात्मक उपाय काय असू शकतात

- या परिसरात रहाणार्‍या नागरीकांना वातानुकुलित यंत्रणा बंद करण्यास सांगितले आहे.- तसेच नळाचे पाणी पिऊ नये असे सांगण्यात आले आहे.- त्वचा उघडी ठेवू नये – चेहरा ओल्या टॉवेलने झाकावा

close