जयराज फाटक यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

March 15, 2011 9:55 AM0 commentsViews: 2

15 मार्च

आदर्श सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईचे माजी महानगरपालिका आयुक्त जयराज फाटक यांच्या घरांवर आणि ऑफिसवर सीबीआयनं छापे टाकलेत. मुंबई, पुणे,यवतमाळ आणि दिल्लीतल्या घर आणि ऑफिसेसवर छापे टाकण्यात आले. सीबीआयनं टाकलेल्या या धाडीत जयराज फाटक यांचे दिल्लीत एक तर मुंबईत तीन लॉकर्स असल्याचे निष्पन्न झाले. यातील दिल्ली येथील एक आणि मुंबईतले 2 लॉकर्स त्यांच्या बायकोच्या नावे असून मुंबईतला आणखी एक लॉकर सुनेच्या नावानं आहे. ही सर्व लॉकर्स बँक ऑफ इंडियात असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. दिल्लीबरोबर मुंबईत चार ठिकाणी धाडी टाकल्या यात साईप्रसाद, नवी मुंबईतली वनश्री सोसायटी, अंधेरीतली मीरा वर्सोवा आणि आदर्श सोसायटी इथं धाडी टाकल्या. तर पुण्यात निगडी इथल्या पुष्कराज या घरीही धाड टाकली. जयराज फाटक यांच्याकडे 22 बँक खाती आहेत. जवळपास 50 लाख रुपये फिक्स डिपॉझिट आहेत. सध्या त्यांचे लॉकर्स आणि बँक अकाऊंट तपासण्याचं काम सुरु आहे. जयराज फाटक हे सध्या केंद्रीय ग्रामीण विद्युतीकरण विभागाचे ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे.

close