औरंगाबादच्या कला महाविद्यालयाची दुरावस्था

November 7, 2008 1:54 PM0 commentsViews: 6

7 नोव्हेंबर,औरंगाबाद औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाची दुरावस्था झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणलेले कॉम्प्युटर गेले वर्षभर सॉफ्टवेअरअभावी धूळ खात पडले आहेत. विद्यार्थ्यांना आणखी बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या दुरावस्थेकडे महाविद्यालय प्रशासनानं पूर्ण दुर्लक्ष केलंय. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील असुविधा आयबीएन लोकमतचे सिटीझन जर्नलिस्ट बनून प्रशासनासमोर मांडल्या. वेळेवर लेक्चर नाहीत. परीक्षांचा ठावठिकाणा नाही. लायब्ररी नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी सिटीझन जर्नलिस्टच्या माध्यमातून मांडलं.

close